आठवले जेव्हा मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतात...

आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली आहे.

Updated: Apr 12, 2017, 09:53 PM IST
आठवले जेव्हा मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतात... title=

मुंबई : आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली आहे. लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर या कार्यक्रमामध्ये आठवलेंनी खास त्यांच्या शैलीमध्ये मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले. या प्रश्नांची मुख्यमंत्र्यांनीही दिलखुलास उत्तरं दिली.

रामदास आठवलेंनी केलेल्या कवितांना मुख्यमंत्र्यांनीही कवितेच्याच माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे. नायक चित्रपटामध्ये मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेणाऱ्याला एक दिवसाचं मुख्यमंत्रीपद मिळतं तर तुम्ही मला किती दिवसांचा मुख्यमंत्री बनवणार असा प्रश्न आठवलेंनी मुख्यमंत्र्यांना विचारला. आठवलेंच्या या प्रश्नाचंही मुख्यमंत्र्यांनी याच शैलीत उत्तर दिलं. 

पाहा संपूर्ण मुलाखत