ठाकरे कुटुंबातील तीन दिग्गज व्यक्तीमत्त्व!

दिवाळीनिमित्त घेतलेल्या खास मुलाखतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या आई-वडिलांच्या आठवणी जागवल्या. श्रीकांत ठाकरे यांच्या व्यक्तीमत्त्वाचे अनेक पैलू राज ठाकरेंनी सांगितले.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Nov 4, 2013, 08:22 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दिवाळीनिमित्त घेतलेल्या खास मुलाखतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या आई-वडिलांच्या आठवणी जागवल्या. श्रीकांत ठाकरे यांच्या व्यक्तीमत्त्वाचे अनेक पैलू राज ठाकरेंनी सांगितले.
एक संगीतकार, व्यंगचित्रकार, वादक, चित्रपट समिक्षक अशा विविध भूमिका श्रीकांत ठाकरे यांनी आपल्या आयुष्यात पार पाडल्या. पण आपल्या या नि:स्वार्थ कार्याचा त्यांनी कधीही मोबदला मागितला नाही.
श्रीकांत ठाकरेंनी उर्दूचा दांडगा अभ्यास केला होता. शिवसेनेत उर्दू येणारे आणि ते समजावून सांगणारे फक्त माझे वडीलच होते, असं राज ठाकरे म्हणतात. मोहम्मद रफींना मराठी येत नसल्यानं श्रीकांत ठाकरेंनी मराठी गाणी त्यांना उर्दूतून शिकवली आणि ती त्यांच्याकडून गाऊन घेतली.
‘मार्मिक’ आणि श्रीकांत ठाकरेंचं खूप जवळचं नातं होतं. त्यांनी बाळासाहेबांसोबत मार्मिक सुरू केलं होतं. मार्मिकमधील सगळं व्याकरण ते तपासून घ्यायचे. मार्मिकचा वर्धापन दिन सोहळा सोडला तर ते व्यासपीठावर कधीच यायचे नाही.
मार्मिकची निघेपर्यंतची संपूर्ण जबाबदारी बाबांची होती, असंही राज ठाकरे म्हणाले.... या आणि अशा अनेक आठवणी जाणून घ्या राज ठाकरे यांच्याचकडून...

पाहा राज ठाकरेंची संपूर्ण मुलाखत