मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज रेल्वे प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दादर स्थानकाचा दौरा केला... मात्र केवळ पाच मिनिटांतच त्यांना सगळ्या समस्यांची जाणीव पुरेपुर झाली असावी... कारण त्यांनी लगेचच आपला हा दौरा आटोपता घेतला.
गर्दीच्या वेळी गाडीतून उतरल्यापासून दादर स्टेशनबाहेर यायलाच मुळी १० मिनिटं लागतात... पुलावर बसणारे फेरीवाले, भिकारी यांच्यातून मार्ग काढत कसंबसं बाहेर पडावं लागतं...
राज ठाकरेंनी मात्र दुपारच्या कमी गर्दीच्या वेळात समस्यांचा धावता आढावा घेतला, तो कशासाठी असा प्रश्न प्रवाशांना पडल्यास नवल नाही... मनसेकडे मात्र या प्रश्नाचं उत्तर तयार आहे. प्रवाशांना त्रास होऊ नये, म्हणून केवळ पाचच मिनिटं दौरा केल्याचं पक्षाचे नेते सांगतायत...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.