...म्हणून टाटांनी माझी पाठ थोपटली - राज ठाकरे

राज ठाकरेंनी आज निवडणुकीच्या प्रचारासाठी पहिली सभा घेतली. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांमध्ये हात घातला. खास करुन त्यांनी नाशिकमधल्या विकास कामांचा पाढा बोलून दाखवला. यावेळी बोलतांना त्यांनी नाशिकमध्ये केलेल्या बोटॅनिकल गार्डनचा विशेष उल्लेख केला.

Updated: Feb 14, 2017, 09:51 PM IST
...म्हणून टाटांनी माझी पाठ थोपटली - राज ठाकरे title=

मुंबई : राज ठाकरेंनी आज निवडणुकीच्या प्रचारासाठी पहिली सभा घेतली. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांमध्ये हात घातला. खास करुन त्यांनी नाशिकमधल्या विकास कामांचा पाढा बोलून दाखवला. यावेळी बोलतांना त्यांनी नाशिकमध्ये केलेल्या बोटॅनिकल गार्डनचा विशेष उल्लेख केला.

नाशिकमधलं बोटॅनिकल गार्डनला टाटा ट्रस्टने सुरुवातीला ३ कोटी दिले पण आम्ही केलेलं कामं पाहून त्यांनी १४ कोटी दिले. असं राज यांनी म्हटलं. नाशिकमधलं बोटॅनिकल गार्डनचं काम पाहून रतन टाटा म्हणाले 'वेल डन राज'. नाशिक सोडून महाराष्ट्रातल्या कोणत्याही शहरात बोटॅनिकल गार्डनसारखं एकतरी सुंदर उद्यान आहे का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.