मुंबई : राज ठाकरेंनी आज निवडणुकीच्या प्रचारासाठी पहिली सभा घेतली. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांमध्ये हात घातला. खास करुन त्यांनी नाशिकमधल्या विकास कामांचा पाढा बोलून दाखवला.
राज ठाकरे यांनी म्हटलं की, मी जे ५ वर्षांत नाशिकमध्ये करून दाखवलं ते यांना २५ वर्षांत करून नाही दाखवता आलं. नाशिकमध्ये या आणि विकासकामं पाहा. नाशिकसारख्या सुविधा मुंबईत का नाही?. नाशिकच्या पाच वर्षांच्या काळात १८ महिने आयुक्त नव्हता तरीही कामं केली.
गेल्या वर्षी पाऊस पडल्यावर चॅनेलवाले मुंबई ठाणे पुण्यातील रस्त्यातील खड्ड्यांच फुटेज शूट करून गेले, त्यांना नाशिकमध्ये एकही खड्डा सापडला नाही. खड्डे बुजवण्याचं मुंबई महापालिकेचं बजेट आहे दर वर्षांला १०० कोटी. हे जगात फक्त मुंबईत असेल.