मनसेतील गळती रोखण्यासाठी राज ठाकरेंची धावाधाव

मुंबई महापालिका निवडणूक जवळ येत असतानाच मनसेला गळती लागली आहे. आता ही पडझड थांबवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची धावाधाव सुरू झाली आहे. 

Updated: May 4, 2016, 03:54 PM IST
मनसेतील गळती रोखण्यासाठी राज ठाकरेंची धावाधाव title=

मुंबई : मुंबई महापालिका निवडणूक जवळ येत असतानाच मनसेला गळती लागली आहे. आता ही पडझड थांबवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची धावाधाव सुरू झाली आहे. 

याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी आपल्या कृष्णकुंज या निवासस्थानी मनसे नगरसेवकांची बैठक सुरू आहे. या बैठकीला पक्षाचे बहुतांश नगरसेवक उपस्थित आहेत. या बैठकीत त्यांनी नगरसेवकांना इशारा दिलाय. आतापर्यंत पक्षात खूप लोकशाही पाळली. आता ओरिजिनल राज ठाकरे व्हायला भाग पाडू नका, असा सज्जड दमच राज ठाकरेंनी उपस्थित नगरसेवकांना भरलाय.

 
काही समस्या असतील तर त्या आपल्यासमोर मांडण्याच्या सूचनाही त्यांनी नगरसेवकांना केल्या. आतापर्यंत मनसेचे चार नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. तर एक नगरसेवक भाजपच्या वाटेवर आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये मनसेचे नगरसेवक ओढण्याची स्पर्धा सुरू आहे. त्यामुळं ही पडझड रोखण्याचं आव्हान राज ठाकरे यांच्यापुढं आहे.