मुंबई : शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रचाराच्या या मैदानामध्ये मात्र राज ठाकरे अजूनही गायब आहेत. पण आता 14 फेब्रुवारीपासून राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे.
याआधी 9 फेब्रुवारीला कांदिवलीमध्ये राज ठाकरे प्रचाराचा नारळ फोडणार होते. वैयक्तिक कारणांमुळे राज ठाकरेंनी प्रचाराचा शुभारंभ पुढे ढकलला असल्याचं मनसेकडून सांगण्यात येत आहे. राज ठाकरे मुंबईत प्रचाराच्या तीन सभा तर ठाणे, पुणे आणि नाशिकमध्ये प्रचाराची प्रत्येकी एक सभा घेणार आहेत.
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017
संध्याकाळी 6.00 वाजता कन्नमवार नगर, विक्रोळीमध्ये जाहीर सभा
संध्याकाळी 7.30 वाजता विलेपार्ले पूर्वमध्ये जाहीर सभा
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017
संध्याकाळी 6.00 वाजता दिवा, ठाणेमध्ये जाहीर सभा
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017
नाशिकमध्ये जाहीर सभा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017
पुण्यामध्ये जाहीर सभा