राजना आवरणार कोण? - काँग्रेसला प्रश्न

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस समन्वय समितीच्या बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कसे रोखावे याबाबत चर्चा करण्यात आली. राजना रोखण्याबाबत खास रणणिती ठरवण्यात आली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 11, 2012, 11:56 AM IST

www.24taas.comमुंबई
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस समन्वय समितीच्या बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कसे रोखावे याबाबत चर्चा करण्यात आली. राजना रोखण्याबाबत खास रणणिती ठरवण्यात आली.
राज ठाकरे यांनी सीएसटी हिंसाचार प्रकरणी मोर्चा काढून राज्यातील सरकारला धारेवर धरत जोरदार टीका केली. गृहमंत्री आर आर पाटील हेच याला जबाबदार असल्याचे म्हटले. राज आक्रमक झाल्याने सरकारची कोंडी झाली होती. त्यामुळे राज यांना आवरणे गरजेचं असल्याचे मत राजकीय वर्तुळात व्यक्त होत होते. काही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते यांनी नाराजी व्यक्त केली होती. परंतु त्यांना जाहीरपणे बोलता येत नव्हते. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या समन्वय समितीची काल रात्री बैठक झाली. त्या बैठकीत राज ठाकरेंना रोखण्याबाबतची रणनिती ठरवण्यात आली.
कायद्याच्या चौकटीत राहून राज ठाकरेंवर काय कारवाई करता येईल याबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी चर्चा केली. दोन्ही पक्षाच्या नेत्यांची राज यांच्यावर कारवाई करण्याबाबत सहमती झाली. याच बैठकीत मराठवाड्यातल्या दुष्काळी स्तिथीबाबतही चर्चा झाली. पिण्याच्या पाणाचं पुढच्या एक वर्षाचं नियोजन करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. तर
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी ठाकरी राग आळवलाय. सीएसटी हिंसाचार प्रकरणातील गुन्हेगाराला अटक करण्यासाठी गेलेल्या मुंबई पोलिसांवर कारवाई करण्यासंदर्भात पत्र देणा-या बिहार राज्याच्या सचिवानं मोठी चूक केल्याचं मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी व्यक्त केलंय.