बघावे तेव्हा मोदी हे परदेश दौऱ्यावर असतात : राज ठाकरे

भाजपने अच्छे दिन येतील, असे निवडणुकीआधी सांगितले. मात्र, १०० दिवस अलटून गेले तरी अच्छे दिन आलेले नाहीत. त्यामुळे भाजप खोटं बोलणारी पार्टी आहे, हे दिसून येत आहे, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर केली. बघावे तेव्हा मोदी हे परदेश दौऱ्यावर असतात. जास्त काळ परदेशात राहणारे पहिले पंतप्रधान असतील असे म्हणत राजनी नरेंद्र मोदींना टार्गेट केले.

Updated: Oct 29, 2015, 04:10 PM IST
बघावे तेव्हा मोदी हे परदेश दौऱ्यावर असतात : राज ठाकरे title=

मुंबई : भाजपने अच्छे दिन येतील, असे निवडणुकीआधी सांगितले. मात्र, १०० दिवस अलटून गेले तरी अच्छे दिन आलेले नाहीत. त्यामुळे भाजप खोटं बोलणारी पार्टी आहे, हे दिसून येत आहे, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर केली. बघावे तेव्हा मोदी हे परदेश दौऱ्यावर असतात. जास्त काळ परदेशात राहणारे पहिले पंतप्रधान असतील असे म्हणत राजनी नरेंद्र मोदींना टार्गेट केले.

मोदींवर हल्लाबोल करताना राज म्हणालेत, कोणीतरी सांगितले की, अभिनेता सलमान खानचा 'बजरंगी भाईजान पार्ट २' येत आहे. त्यात सलमान खान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मायदेशी घेऊन येणार आहे. मोदींना आजही गुजरातबद्दल प्रेम आहे. कोणाला एकाद्या प्रांताबाबत प्रेम यावर आक्षेप नाही. मात्र, मुंबई - अहमदाबात अशी बुलेट ट्रेन सुरु करुन हे करणार काय? त्यांनी मुंबई - कोलकाता, मुंबई - चेन्नई , दिल्ली - कन्याकुमारी अशी ट्रेन का नाही. मुंबईतून अहमदाबातमध्ये जाणार कोण? तिथे जाऊन ढोकला खाऊन येणार का, असे राज म्हणाले.

पाहा राज ठाकरे यांनी कोणाचा घेतला समाचार

अच्छे दिन येतील असे आम्ही बोललो नाही : भाजप

माझे कोणाबरोबर भांडण नाही?

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.