www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर नॉट रिचेबल झालेले राज ठाकरे आज अखेर रिचेबल झाले. लोकसभा निवडणुकीतल्या पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी मनसेची आज चिंतन बैठक झाली.
लोकसभेच्या निकालाचा ट्रेण्ड विधानसभा निवडणुकीत दिसणार नाही, असा सूर त्यांच्या मार्गदर्शनातून व्यक्त झाला. त्यासाठी त्यांनी १९८० सालापासून आतापर्यंतच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे दाखले दिले आणि लोकसभेतला ट्रेण्ड हा विधानसभेला कसा बदलतो, हे पटवण्याचा प्रयत्न झाला...... एकंदरीतच अपने भी दिन आएँगे, अशाच आशयाचा संदेश या बैठकीत दिल्याचं समजतंय.
आता पुन्हा २२ मेला मनसेच्या पदाधिका-यांची बैठक होणार आहे..... त्यानंतर ३१ मेला मुंबईत सोमय्या मैदानात जाहीर सभा घेऊन, राज ठाकरे भूमिका जाहीर करणार आहेत. तसंच विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी जूनपासून मनसेच्या विभागवार बैठकांचा धडाका सुरू होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.