मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्यांवर भाजप आणि शिवसेनेचा समाचार घेतला. 'शिवसेना सत्तेत आहे की विरोधात हेच कळत नाही. अडचणीचे मुद्ये असले की विरोध करायचा आणि सत्तेचाही उपभोग घ्यायचा' असा टोला राज ठाकरे यांनी शिवसेनेला लगावला.
जेएनयूच्या मुद्द्यावरून भाजपला लक्ष्य करत पुढच्या काळात भाजप दंगली घडवेल असा घणाघाती आरोप त्यांनी केला. हे प्रकरण नेमकं काय आहे हेच कळत नाही. देशविरोधात घोषणा देणाऱ्यांना आत टाका, राजकारण करु नका, असं देखील त्यांनी म्हटलं.
मेक इन इंडिया काय आहे हेच कळत नाही. पंतप्रधान अजून देशाचे वाटतंच नाही आहे, असं म्हणत राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील टीका केली.