मुंबई : जैन धर्मियांच्या पर्युषण काळात मांस विक्रीवर बंदी आणण्याच्या मागणीवर राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे.
हा महाराष्ट्र आहे, गुजरात नाही, महाराष्ट्रात कुणी काय खावं?, किंवा काय खावू नये? हे जैनांनी ठरवू नये, अशा शब्दात राज ठाकरे यांनी टीका केली आहे.
मांस विक्री करणाऱ्यांना मनसे संरक्षण देणार असल्याचंही यावेळी राज ठाकरे यांनी सांगितलं.
पंतप्रधान मोदींच्या जीवावर डोकी वर काढताय का?, उद्या हे प्रत्येक गोष्टीत हे शिरतील, या प्रत्येक गोष्टींचा वापर भाजप करून घेणार, मुळात भाजपने या सर्व गोष्टी पेरल्या आहेत, यांच्या इमारती या बांधणार, यांची गुजराती लोकचं येथे राहायला येणार, मराठी शाकाहारी माणसं असले तरीही, असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.