महाराष्ट्र सदन वादात राज ठाकरेंचा शिवसेनेला अप्रत्यक्ष पाठिंबा

महाराष्ट्र सदनातील खासदारांच्या राड्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवसेनेची पाठराखण केलीय. महाराष्ट्र सदनात मुस्लिम धर्मीय मॅनेजरला चपाती खाऊ घालण्याचा प्रकार अनवधानानं झाला असेल, जाणीवपूर्वक नाही, असं त्यांनी सांगितलं. 

Updated: Jul 24, 2014, 08:45 PM IST
महाराष्ट्र सदन वादात राज ठाकरेंचा शिवसेनेला अप्रत्यक्ष पाठिंबा title=

मुंबई: महाराष्ट्र सदनातील खासदारांच्या राड्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवसेनेची पाठराखण केलीय. महाराष्ट्र सदनात मुस्लिम धर्मीय मॅनेजरला चपाती खाऊ घालण्याचा प्रकार अनवधानानं झाला असेल, जाणीवपूर्वक नाही, असं त्यांनी सांगितलं. 

महाराष्ट्र सदनात जे घडलं ते पाहिलं तर केवळ रोजा तोडण्यासाठी राजन विचारे यांनी कॅटरिंग सुपरवायझरला पोळी खाऊ घातली, असं वाटत नसल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय. 

मात्र अपुऱ्या सुविधांबाबत राडा करता, मग महाराष्ट्रातील जनता अपुऱ्या सुविधांमध्ये होरपळतेय. त्याविरोधात संसदेत आवाज का नाही उठवत, असा सवालही राज ठाकरेंनी शिवसेनेला उद्देशून केलाय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.