मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कन्या उर्वशी हिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
उर्वशीचा शनिवारी रात्री अपघात झाला होता. त्यानंतर तिला हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी उर्वशीला घरी सोडण्यात आलं.
विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख आणि उर्वशीचे काका उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नीसह दररोज येऊन तिची विचारपूस करत होते. उर्वशीला घरी नेण्यासाठी स्वतः राज ठाकरे, सौ. शर्मिला ठाकरे आणि अन्य कुटुंबीय आले होते.
डिस्चार्ज मिळाल्यावर उर्वशीनं प्रथम सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर कृष्णकुंजवर गेली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.