मुंबई : नाशिकमध्ये मनसेचे माजी आमदार वसंत गीते यांनी आपल्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका पत्राद्वारे ठाकरी शैलीत भाष्य केले आहे.
राज ठाकरे यांनी प्रसिद्धी पत्रक काढून राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांवर बोचरी टीका केली आहे. ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी माझ्याकडे राजीनामे पाठविलेले आहेत. त्या सर्व राजीनाम्यांचा पक्षाध्यक्ष म्हणून मी स्वीकार करीत आहे. आजच्या परिस्थितीत कोण-कोण माझ्यासोबत आहेत, हे सुद्धा मला कळले आहे. असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत १३ आमदारसह आपला प्रभाव टाकणाऱ्या राज ठाकरे यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत केवळ १ आमदार निवडून आणता आला. त्यांनी जाहीर केलेल्या महाराष्ट्राच्या विकासाच्या ब्ल्यू प्रिंटचा काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे मुंबईतून प्रविण दरेकर आणि नाशिकमधून वसंत गितेंसह अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिलेत. यावर राज ठाकरे यांनी कोणतेही भाष्य केले नव्हते. आता त्यांनी पहिल्यांना पक्षाच्या लेटर हेडवर आपली भूमिका मांडली आणि आपण न डगमगता पुढे जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.