'अखंड महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी वेगळ्या विदर्भाची भाषा करू नये'

अखंड महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसून देवेंद्र फडणवीसांनी वेगळ्या विदर्भाची भाषा करू नये, अन्यथा त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी राहू नये, असं नारायण राणे यांनी म्हटलंय.

Updated: Nov 4, 2014, 05:02 PM IST
'अखंड महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी वेगळ्या विदर्भाची भाषा करू नये' title=

मुंबई : अखंड महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसून देवेंद्र फडणवीसांनी वेगळ्या विदर्भाची भाषा करू नये, अन्यथा त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी राहू नये, असं नारायण राणे यांनी म्हटलंय. ते मुंबईत एका पत्रकार परिषदेत बोलत होते. पराभवानंतर राणेंची ही पहिलीच पत्रकार परिषद होती.

यावेळी, काँग्रेस नेते नारायण राणे यांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देतानाच मुख्यमंत्र्यांवर आणि त्यांच्या मंत्रिमंडळावर अविश्वासही व्यक्त केलाय. फडणवीसांचं हे मंत्रिमंडळ दिलेली आश्वासनं पूर्ण करू शकतील असं वाटत नाही, असं त्यांनी म्हटलंय.

देवेंद्र फडणवीस यांची अभ्यासू नेता अशी चांगल प्रतिमा असली तरी आश्वासनं पूर्ण करण्याची क्षमता फडणवीसांमध्ये नाही... फडणवीसांकडे मुख्यमंत्र्यांकडे असायला हवं असं व्यवहार चातुर्य नाही, असं म्हणत राणेंनी थेट टीका केलीय.

फडणवीसांचं मंत्रिमंडळ खूपच कमजोर आहे... खडसे सोडून आत्ताच्या मंत्रिमंडळात एकही उल्लेखनीय नाव नाही, असं म्हणत राणेंनी मंत्रिमंडळावरही अविश्वास व्यक्त केलाय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.