www.24taas.com, मुंबई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे ह्यांनी शिवसैनिकांसाठी राज्यव्यापी दौरा काढला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात जाऊन उद्धव ठाकरे शिवसैनिकांची भेट घेणार आहेत.
१४ डिसेंबर रोजी उद्धव ठाकरे नागपूरच्या दौर्यावर येत आहेत. तर त्याच दिवसापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील विदर्भाच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे समजते. त्यामुळे आता पुन्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे राजकीय शह देण्यासाठी एकमेकांसमोर येणार की, सरकारला दोघं मिळून शह देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
१० डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होत असल्याने उद्धव ठाकरे अधिवेशनात मांडल्या जाणार्या प्रश्नांसंबंधी ते शिवसेना आमदारांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हेही याच दरम्यान विदर्भाच्या दौर्यावर येणार आहेत. त्यामुळे मनसे कशाप्रकारे अधिवेशन गाजवणार याकडेच सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि विदर्भातील विविध प्रश्नांवर यावेळी राज ठाकरे पदाधिकार्यांसोबत चर्चा करणार आहेत.