www.२४taas.com, मुंबई
आगामी २०१३ या नवीन वर्षात शासकीय कर्मचार्यां ना तब्बल ९१ सुट्ट्यांचा आनंद लुटता येणार आहे. यामध्ये रविवारच्या ५२, दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारच्या २४ तर इतर १५ अशा ९१ सुट्ट्यांचा समावेश आहे. मात्र नव्या वर्षात हक्काच्या ७ सुट्ट्या बुडणार आहेत.
दरवर्षी नवे वर्ष जवळ आले की दिनदर्शिकेत सण, यात्रा, जत्रा, ऊरूस यांच्या सुट्ट्या किती आहेत याचा शोध घेतला जातो. शासकीय कर्मचारी नव्या वर्षात किती सुट्ट्या आहेत हे पाहतात. गेल्या सन २०११ मध्ये शासकीय कर्मचार्यां ना ८६ सुट्ट्या मिळाल्या होत्या. तर सन २०१२ मध्ये रविवार, दुसरा चौथा शनिवार आणि इतर सण अशा एकूण १०० सुट्ट्यांचा लाभ झाला होता.
नवीन वर्षात जानेवारीमध्ये २५ पासून २७ पर्यंत ईद-ए-मिलाद, प्रजासत्ताकदिन आणि रविवार सलग तीन दिवस सुट्ट्या मिळणार आहेत. ऑगस्ट महिन्यातही दि. ९ ते ११ पर्यंत रमजान ईद, दुसरा शनिवार आणि रविवार अशा सलग तीन दिवस सुट्ट्या आहेत.
सन २०१२ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती रविवार, दि. १९ रोजी आली होती. त्यामुळे ही सुट्टी हुकली होती. मात्र २०१३ मध्ये मंगळवार १९ फेब्रुवारी रोजी जयंती आल्याने सुट्टी मिळणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दि. १४ रोजी म्हणजेच दुसर्या व शनिवारी आल्याने ती सुटी बुडाली होती.
नव्या वर्षात नोव्हेंबर महिन्यातच दिवाळी दि. १ पासून सुरू होणार आहे. दि. ५ नोव्हेंबर रोजी भाऊबीज आहे. सन २०१२ मध्ये कामगारदिन हा मंगळवारी होता. त्यामुळे एमआयडीसीतील कामगारांची सुट्टी बुडाली होती. नव्या वर्षात मात्र कामगारदिन हा बुधवारी आला आहे. त्यामुळे कामगारांना सलग दोन दिवस सुट्टी मिळणार आहे.
नव्या वर्षात मार्चमध्ये एकही विवाह मुहूर्त नाही. २०१२ मध्ये नोव्हेंबर महिन्यात दि. २९ आणि ३० असे दोनच दिवस विवाह मुहूर्त होते. तर नव्या वर्षात नोव्हेंबर महिन्यात एकूण आठ मुहूर्त आहेत. नव्या वर्षात सात सुट्ट्या बुडणार आहे. पारशीदिन, दसरा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महाशिवरात्र रविवारी आहेत. तर बुद्ध पौर्णिमा चौथ्या शनिवारी (२५ मे) आल्याने ती सुट्टी बुडणार आहे.