मुंबई आणि उपनगरात पाऊस, पश्चिम- मध्य रेल्वे उशिरा

मुंबई आणि उपनगरांना पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडासह रात्रभर पाऊस कोसळत आहे. या पावसाचा फटका रेल्वेला बसला आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या गाड्या १० ते १५ मिनिटांनी उशिराने धावत आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 19, 2013, 09:13 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई आणि उपनगरांना पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडासह रात्रभर पाऊस कोसळत आहे. या पावसाचा फटका रेल्वेला बसला आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या गाड्या १० ते १५ मिनिटांनी उशिराने धावत आहेत.
मुंबईसह ठाणे जिल्ह्यात काल रात्रीपासून संततधार पाऊस आहे. पावसाचा पहिला फटका रेल्वेसेवेला बसला. सकाळपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेचे वाहतूक मंदावली होती. मध्यरेल्वे १५ ते २० मिनीटे तर पश्चिम रेल्वे १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होती. कुलाबा वेधशाळेत ४५.६ मीमी पावसाची नोंद झाली. तर सांताक्रूझ वेधशाळेत २२.२ मीमी पावसाची नोंद झाली.
बुधवारी सायंकाळी तुरळक पाऊस पडत होता. मात्र, रात्री १० नंतर मुंबई आणि उपनगरांत विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडासह मुसळधार पाऊस कोसळत होता. विजा जवळपास दोन तास चमकत होत्या. या पावसामुळे कोठेही हानी झाली झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, पहाटे ५ वाजण्याच्या दरम्यान पावसाने विश्रांती घेतली होती. ठाणे, नवी मुंबई जोरदार पाऊस झाला.
रात्रभर पडत असलेल्या जोरदार पावसचा फटका रेल्वे सेवेला बसलाय. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या गाड्या १० ते १५ मिनिटांनी उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. तर काल बुधवारी मोटरमननी अचानक काम बंद आंदोलन केल्याने हार्बची डाऊन सेवा जवळपास चार तास पूर्णपणे ठप्प होती. डाऊन मार्गावर रेल्वे नसल्याने कुर्ला येथे प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. तर अप मार्गावरील गाड्या ३० ते ४० मिनिटे उशिराने धावत होत्या.
मोटरमननी हजारो प्रवाशांना वेठीस धरल्याने संताप व्यक्त होत होता. त्यात कुर्ला ते टिळक नगर दरम्यान बेलापूर गाडी बंद पडल्याने प्रवासी दोन तास गाडीतच अडकून पडले होते. त्यानंतर ही गाडी टिळकनगर स्थानकात खाली करण्यात आली. रात्री ८ वाजल्यानंतर सेवा सुरू झाली. मात्र, गाड्य़ा १० ते १५ मिटांने उशिराने धावत होत्या.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.