रेल्वे बजेट : काय आहे मुंबईला मिळालेलं 'एमयूटीपी-३'

मुंबईसाठी 'एमयूटीपी-३'ला मंजुरी देण्यात आल्याचं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना जाहीर केलंय. त्यामुळे, गेल्या कित्येक दिवसांपासून लालफितीत अडकलेल्या या प्रकल्पाला थोडी का होईना चालना मिळालीय.

Updated: Feb 26, 2015, 03:48 PM IST
रेल्वे बजेट : काय आहे मुंबईला मिळालेलं 'एमयूटीपी-३' title=

मुंबई : मुंबईसाठी 'एमयूटीपी-३'ला मंजुरी देण्यात आल्याचं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना जाहीर केलंय. त्यामुळे, गेल्या कित्येक दिवसांपासून लालफितीत अडकलेल्या या प्रकल्पाला थोडी का होईना चालना मिळालीय.

मुख्य म्हणजे, सुरेश प्रभू यांनी 'एमयूटीपी ३'या प्रकल्पाचा उल्लेख संसदेत रेल्वे बजेटमध्ये केला असला तरी हा प्रकल्प संपूर्णत: केंद्र सरकारचा नाही. या प्रकल्पात ५० टक्के राज्य सरकार आणि ५० टक्के रेल्वे मंत्रालयाचा (केंद्राचा) सहभाग असणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, 'एमयूटीपी-२' अजून पूर्ण झालेला नाही तरी 'एमयूटीपी-३'ला मंजुरी देणाऱ्या रेल्वेमंत्र्यांनी या प्रकल्पासाठी कुठून पैसे येणार हे मात्र स्पष्ट केलेलं नाही. 

एमयूटीपी प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्यात...

  • छत्रपती शिवाजी टर्मिनस - पनवेल फास्ट कॅरिडोअर

  • विरार - वसई -दिवा - पनवेल कॅरिडोअर 

  • विरार ते डहाणू तीसरा आणि चौथा मार्ग

  • हार्बरवरील गोरेगाव ते बोरीवलीपर्यंत विस्तार

  • बोरीवली ते विरार पाचवा आणि सहावा मार्ग,

  • कल्याण ते कसारा तिसरा आणि चौथा मार्ग

  • कल्याण ते कर्जत तीसरा आणि चौथा मार्ग

  • पनवेल-कर्जत दुहेरीकरण

  • ऐरोली-कळवा लिंक रोड

या प्रकल्पांचा समावेश आहे. यामध्ये, मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावरील दोन स्थानकांमधील रूळ ओलांडणे रोखण्यासाठी विविध योजना आणि तांत्रिक कामे तसेच नवीन डबे आणि लोकलची खरेदी योजनांचाही समावेश आहे. या प्रकल्पांची एकूण किंमत ११ हजार ४४१ कोटी रुपये एवढी आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.