रेल्वे बुकिंग कांउटर्स होणार डिजिटल

नोटाबंदीनंतर कॅशलेस व्यवहाराच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकताना आता रेल्वेही लवकरच आपल्या सर्व सुविधा कॅशलेस पद्धतीने देणार आहे.

Updated: Dec 2, 2016, 03:20 PM IST
रेल्वे बुकिंग कांउटर्स होणार डिजिटल title=

मुंबई: नोटाबंदीनंतर कॅशलेस व्यवहाराच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकताना आता रेल्वेही लवकरच आपल्या सर्व सुविधा कॅशलेस पद्धतीने देणार आहे.
 
स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आयसीआयसीआय समवेत इतर बँकांशी करार करून देशातील १२ हजार रेल्वे बुकिंग काउंटर्सवर पीओएस मशीन बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या मशीन रेल्वे बुकिंग काऊंटर्सवर उपलब्ध करून दिल्यानंतर प्रवासी डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या सहाय्याने तिकीट काढू शकतील.

३१ डिसेंबर २०१६ पर्यंत एक हजार मशीन्स बसवण्यात येतील. देशातील १२ हजार तिकीट खिडक्यांवर प्रत्येकी एक किंवा दोन मशीन उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
 
देशातील सर्व तिकीट खिडक्यांवर पूरेशा प्रमाणात पीओएस मशीन उपलब्ध झाल्यास कर्मचाऱ्याच्या कामाचा बोजा हलका होईल आणि कामात सुलभता येईल. प्रवाशांना देखील तासनतास रांगेत उभे राहण्यापासून सुटका मिळेल.