गिरणी कामगारांचे मुंबईत सोडतीच्यावेळी आंदोलन

गिरणी कामगारांना मुंबईतच घरी मिळाली पाहिजेत या मागणीसाठी गिरणी कामगार वारस उत्कर्ष संघांच्यावतीने रंगशारदा सभागृहाबाहेर आंदोलन केले. गिरणी कामगारांना म्हाडाच्यावतीने घरे देण्यात येणार आहेत.

Updated: Dec 2, 2016, 01:02 PM IST
गिरणी कामगारांचे मुंबईत सोडतीच्यावेळी आंदोलन title=

मुंबई : गिरणी कामगारांना मुंबईतच घरी मिळाली पाहिजेत या मागणीसाठी गिरणी कामगार वारस उत्कर्ष संघांच्यावतीने रंगशारदा सभागृहाबाहेर आंदोलन केले. गिरणी कामगारांना म्हाडाच्यावतीने घरे देण्यात येणार आहेत.

गिरणी कामगारांच्या घरांसाठटी सोडत आतमध्ये सुरू असतान बाहेर मात्र सोडतीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. सरकार निवडणुकीच्या तोंडावर मुंबईबाहेरची घरे गिरणी कामगारांना वाटत असून सरकार आम्हाला फसवत असल्याचा आरोप या आंदोलकांनी केला. 

गिरणी कामगारांना पनवेल येथे घरे देण्यात आली आहेत. मात्र, मुंबईबाहेर घरे असल्याने अनेक गिरणी कामगारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.