मुजरा पार्टीवर छापा, 12 मुली, 14 पुरूष अटकेत

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील कलोते गावामध्ये मुजरा पार्टीवर पोलिसांनी छापा टाकून अश्लील वर्तवणूक करणाऱ्या १२ मुली आणि १४ पुरुषांना अटक केली आहे.

Updated: Jun 8, 2014, 10:16 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, खालापूर
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील कलोते गावामध्ये मुजरा पार्टीवर पोलिसांनी छापा टाकून अश्लील वर्तवणूक करणाऱ्या १२ मुली आणि १४ पुरुषांना अटक केली आहे.
ए. आर. खत्री यांच्या फार्म हाउसवर नवी मुंबई आणि मुंबई मधील श्रीमंत लोकांची ही पार्टी होती. अटक केलेल्या सर्व आरोपींना खालापूर न्यायालयात दुपारी हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.
दरम्यान, नवी मुंबई मधील ACP सुरेश पवार यांच्या निवृत्तीची पार्टी असल्याचे निष्पन झाले आहे. यावेळी सुरेश पवार यांनाही ताब्यात घेण्यात आले असताना, पवार यांच्याकडे मद्यपानाचा परवाना असल्याने त्यांच्यावर कारवाई झाली नाही.
मुंबईतील उच्चभ्रू वस्तीमध्ये राहणाऱ्या या मुली असून मुलींवर दवलत जादा करणारी पुरुष मंडळी वेगवेगळ्या व्यवसाय क्षेत्रात असल्याची माहिती समोर येतेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.