मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचीही प्रतिष्ठा पणाला लागलीय. या निवडणुकीत दोघांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. तर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आमचेच सरकार येण्याचा दावा केला आहे.
राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर येईल असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. तर मुख्यमंत्र्यांच्या स्वच्छ प्रतिमेचा काँग्रेला फायदा होईल असा दावा काँग्रेस नेते अनिस अहमद यांनी केलाय.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचं वेळापत्रक आज अखेर निवडणूक आयोगानं जाहीर केलं. महाराष्ट्र आणि हरियाणात एकसाथ आणि एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. १५ ऑक्टोबरला मतदान होणार असून १९ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळं दिवाळीपूर्वीच निकालाचा धकामा उडणार असून नवीन सरकार सत्तेवर येणार आहे.
विधानसभेचे 288 आमदार निवडून आणण्यासाठी तब्बल ८ कोटी २५ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राजकीय पक्षांना प्रचारासाठी केवळ २४ दिवसच मिळणार असल्यानं नेत्यांची चांगलीच धावपळ होणार आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच नोटाचा वापर केला जाणार आहे. तसंच मतदारांना घरपोच वोटिंग आयडी स्लीप पुरवली जाणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.