मुंबई : जळगावचं सोनं सर्वत्र प्रसिद्ध आहे, मात्र जळगावातही सोन्याच्या बाजारपेठेत शुकशुकाट आहे, कारण येथल्या ज्वेलर्सनी जुन्या ५०० हजाराच्या नोटा न घेण्याचं ठरवलं आहे.
जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल, तर डेबीट, क्रेडीटने कार्डने सोने खरेदी करण्याचं आवाहन जळगावच्या ज्वेलर्सनी ग्राहकांना केलं आहे.
पाचशे, हजाराच्या नोटा स्वीकारत नसल्याने ग्राहकांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली आहे. जळगावात सोन्याचा भाव प्रतितोळा ३० हजार ५०० रूपयांवर आहे.