मुंबई : मातोश्रीवर जाऊन प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानं दरेकर सेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये पराभवानंतर मनसेमध्ये अस्वस्थता असल्याचं चित्रं याआधीही दिसलं होतं.
पण, आता मनसेचा गडात तडे जात असल्याचं स्पष्ट जाणवतं आहे. कारण आज मनसे नेते प्रवीण दरेकर यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंचे निकटवर्ती समजल्या जाणाऱ्या काही माजी आमदारांनी मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आणला होता. त्यात दरेकर यांचाही समावेश होता. त्यानंतर स्वत: राज ठाकरेंनी प्रवीण दरेकर यांचे नगरसेवक बंधू यांना मिटींगमधून काढल्याच्याही बातम्या आल्या.
आता थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील धूसफुस चव्हाट्यावर आल्यानंतर प्रवीण दरेकर यांनीही वेगळा मार्ग निवडण्याचं ठरवलेलं दिसतं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.