‘मनसे’ नाराज दरेकर भाजपच्या वाटेवर?

मनसेचे नाराज माजी आमदार प्रविण दरेकर यांनी मंगळवारी रात्री उशिरा भाजपचे नेते आशिष शेलार यांची भेट घेतली. वरळीतील कल्पना हॉटेलमध्ये ही भेट झाली. 

Updated: Oct 29, 2014, 03:40 PM IST
‘मनसे’ नाराज दरेकर भाजपच्या वाटेवर? title=

मुंबई : मनसेचे नाराज माजी आमदार प्रविण दरेकर यांनी मंगळवारी रात्री उशिरा भाजपचे नेते आशिष शेलार यांची भेट घेतली. वरळीतील कल्पना हॉटेलमध्ये ही भेट झाली. 

‘शेलार आपल्या कुटुंबासाठी हॉटेलमधून पार्सल घेऊन जाण्यासाठी आले असताना ही योगायोगानं झालेली भेट होती’ असं दरेकर आणि शेलार यांनी दोघांनीही म्हटलं असलं, तरी त्यातला ‘योगायोग’ काही लोकांच्या पचनी पडताना दिसत नाहीय. ही भेट केवळ योगायोग असल्याचा दावा दरेकरांनी केला असला तरी या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय.

बाळा नांदगावकरांच्या विधानामुळे नाराज असलेल्या प्रविण दरेकरांनी गेल्याच आठवड्यात मनसेच्या सरटीचणीस पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राज ठाकरेंकडून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू होते.

नाराज प्रविण दरेकर हे भाजपच्यावाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. आशा पार्श्वभूमीवर काल रात्री उशिरा योगायोगानंका होईना त्यांची आशिष शेलारांसोबत झालेल्या भेटीनं राजकीय चर्चांना उधान आलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.