'प्रथम'चं दुसरं यश, दोन महिन्यानंतर मिळाले सिग्नल

इस्रोने विद्यार्थ्यांच्या अंतराळ संशोधन कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यार्थी उपग्रह योजना सुरू केली होती.

Updated: Dec 19, 2016, 10:47 PM IST
'प्रथम'चं दुसरं यश, दोन महिन्यानंतर मिळाले सिग्नल  title=

मुंबई : इस्रोने विद्यार्थ्यांच्या अंतराळ संशोधन कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यार्थी उपग्रह योजना सुरू केली होती. त्या योजनेअंतर्गत आयआयटी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रथम या उपग्रहाचं प्रक्षेपण 26 सप्टेंबरला श्रीहरीकोटा इथून झालं होतं. या यशानंतर आणखी एक यश या विद्यार्थ्यांनी मिळवलंय.

'प्रथम' या उपग्रहातून दोन महिन्यांनंतर पहिल्यांदाच सिग्नल मिळू लागलेत. एवढंच नाही तर इंडोनेशिया, ब्राझिल, नेदरलँड याठिकाणीही 'प्रथम' या उपग्रहाच्या सिग्नल्सवर नजर ठेवली जात आहे.

आयआयटीचे तब्बल 100हून अधिक विद्यार्थी यात सहभागी झाले होते. सप्तर्षी बंडोपाध्याय आणि शशांक तामसकर या दोन विद्यार्थ्यांची ही संकल्पना होती. देशातील 15 विद्यापीठांमध्ये उपग्रहातील माहितीचे संकलन होणार आहे. यात मालाडच्या अर्थव कॉलेजचाही समावेश आहे.