मुंबई कोस्टल रोडला पर्यावरण मंत्रालयाचा ग्रीन सिग्नल

मुंबईच्या कोस्टल रोड प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं मंजुरी दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. या रोडमुळं मुंबईतील वाहतुकीची समस्या सुटण्यास मोठी मदत होणार आहे.

Updated: Jun 8, 2015, 03:53 PM IST
मुंबई कोस्टल रोडला पर्यावरण मंत्रालयाचा ग्रीन सिग्नल title=

नवी दिल्ली: मुंबईच्या कोस्टल रोड प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं मंजुरी दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. या रोडमुळं मुंबईतील वाहतुकीची समस्या सुटण्यास मोठी मदत होणार आहे.

पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. याप्रकरणी १५ जूनपर्यंत अधिसूचना काढण्यात येणार असून १५ ऑगस्टपर्यंत अंतिम नोटिफिकेशन काढण्यात येईल. 

या निर्णयासाठी फडणवीस यांनी जावडेकर यांचे आभार मानले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून मुंबईकरांना भेट देण्यात आली आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

 

दरम्यान, कोस्टल रोडच्या मंजुरीनंतर त्याचं श्रेय लाटण्यावरून चर्चा सुरू झाल्याचं दिसतंय. उद्धव ठाकरेंनी निवडणुकीदरम्यान घोषणा केलेला हा मुद्दा भाजपनं हायजॅक केला का? हा प्रश्न उपस्थित होतोय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.