धावत्या ट्रेनमध्ये पोलीस शिपायाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

एका पोलीस शिपायानं धावत्या ट्रेनमध्ये स्वतावर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. अमर महादेव गायकवाड असं या पोलीस शिपायाचं नाव आहे. 

Updated: Aug 7, 2016, 10:46 AM IST
धावत्या ट्रेनमध्ये पोलीस शिपायाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या title=

मुंबई : एका पोलीस शिपायानं धावत्या ट्रेनमध्ये स्वतावर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. अमर महादेव गायकवाड असं या पोलीस शिपायाचं नाव आहे. 

पहाटे साडेपाचच्या सुमारास बोरीवली-चर्चगेट लोकलमध्ये मालाड ते गोरेगाव स्थानकादरम्यान अमर यांनी स्वताजवळच्या रायफलने छातीत गोळी घालून आत्महत्या केली. या घटनेनंतर त्यांना तातडीनं उपराचासाठी जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथं त्यांना मृत घोषीत करण्यात आलं. अमर हे मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत होते. आज ते लोकल पेट्रोलींगच्या ड्युटीवर होते. त्यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.