मुंबई : अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाचं भूमिपूजन 24 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. अरबी समुद्रातल्या शिवस्मारकाच्या प्रस्तावित जागेचं पंतप्रधान भूमिपूजन करतील.
शिवस्मारकाच्या भूमिपूजनानंतर मोदी बीकेसीमध्ये जाऊन मेट्रो प्रकल्पाचंही भूमीपूजन करणार आहेत. ही दोन्ही भूमिपूजन झाल्यानंतर मोदींची वांद्र्यामध्ये जाहीर सभादेखील होणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी पंतप्रधानांचं हा मुंबई दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.