नाशिक : देशात सध्या प्लास्टिक मनीबरोबरच प्लास्टिक नोटा छापण्याची तयारी रिझर्व्ह बँक करत आहे.
हे काम परदेशात वा पाश्चात्य कंपनीला देऊन नये, अशी मागणी नाशिक करन्सी प्रेसने केली आहे.
मेक इन इंडियाच्या घोषणा होत असतांना नाशिकच्या चलार्थपत्र मुद्रणालयात प्लास्टिकच्या नोटा छपाईचे काम सहजरीत्या होऊ शकते.
यासाठी पायाभूत सुविधा आणि मशीन उपलब्ध करून दिल्यास हे काम नाशिकलाच देण्याची आग्रही मागणी मजदूर संघाने रिझर्व्ह बॅँकेला केली आहे.