अपुऱ्या सोयी-सुविधांमुळे गेला पेंग्विनचा जीव?

मुंबईतल्या जिजामाता उद्यान अर्थात राणीच्या बागेतल्या पेंग्विन मृत्यूप्रकरणी मुंबई महापालिका आयुक्तांना नोटीस बजावण्यात आलीय.

Updated: Nov 3, 2016, 10:42 PM IST
अपुऱ्या सोयी-सुविधांमुळे गेला पेंग्विनचा जीव? title=

मुंबई : मुंबईतल्या जिजामाता उद्यान अर्थात राणीच्या बागेतल्या पेंग्विन मृत्यूप्रकरणी मुंबई महापालिका आयुक्तांना नोटीस बजावण्यात आलीय.

केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने ही नोटीस बजावलीय. अयोग्य सुविधांमुळे पेंग्विनचा मृत्यू झालाय का? असा सवाल या नोटीशीमधून पालिका आयुक्तांना विचारण्यात आलाय. 

तसंच पेंग्विनची योग्य देखभाल केली जातेय का? आणि पेंग्विन ठेवलेली जागा योग्य आहे का? असा सवालही या नोटीशीमधून उपस्थित करण्यात आलाय.

दुसरीकडे पेंग्विन मृत्यू प्रकरणी पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी लोकायुक्तांची भेट घेतलीय. लोकायुक्तांनी या संदर्भात शुक्रवारी दुपारी एक वाजता सुनावणी ठेवलीय. जिजामाता उद्यानाचे उपअधीक्षकांना या सुनावणीला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेत.