पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना दिलासा

 पेण अर्बन बँक घोटाळा प्रकरणात खातेदारांना दिलासा मिळालाय. ५० हजारांच्या ठेवीदारांना १० हजार रुपये द्यावेत असा आदेश हायकोर्टानं दिलाय. 

Updated: Aug 21, 2015, 09:32 AM IST
पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना दिलासा title=

मुंबई :  पेण अर्बन बँक घोटाळा प्रकरणात खातेदारांना दिलासा मिळालाय. ५० हजारांच्या ठेवीदारांना १० हजार रुपये द्यावेत असा आदेश हायकोर्टानं दिलाय. 

अर्बंन बँकांच्या वाढत्या घोटाळ्यांमध्ये सर्वसामान्य ठेवीदाराच होरपळुन निघतात. बँक बुडीत निघाली तरी त्यांच्या ठेवी सुरक्षित राहणे, महत्वाचं असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलंय. 

पाच वर्षांपूर्वी अवसायानात निघालेल्या या बँकेतील आपल्या ठएवी सुरक्षितपणे परत मिळाव्यात आणि बँकेच्या घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे द्या, अशी मागणी करणारी याचिका बँकेच्या ठएवीदारांनी हाय कोर्टात केली होती. त्यावर सुनावणी झाली. त्यावेळी कोर्टाने हे आदेश दिलेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.