मुंबईत लोकलमध्ये गर्दुल्याचा महिलेवर हल्ला

मध्य रेल्वे मार्गावर लोकलमध्ये चढलेल्या गर्दुल्याने महिलेवर केला हल्ला केला. डोंबिवलीत महिलांच्या डब्यातील पहाटेच्यावेळी हा प्रकार घडला. यावेळी डब्यातील सर्व महिलांनी एकत्र येत गर्दुल्याला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.

Updated: Aug 21, 2015, 09:48 AM IST
मुंबईत लोकलमध्ये गर्दुल्याचा महिलेवर हल्ला title=

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर लोकलमध्ये चढलेल्या गर्दुल्याने महिलेवर केला हल्ला केला. डोंबिवलीत महिलांच्या डब्यातील पहाटेच्यावेळी हा प्रकार घडला. यावेळी डब्यातील सर्व महिलांनी एकत्र येत गर्दुल्याला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.

डोंबिवलीत लोकलच्या लेडीज डब्यात घुसलेल्या एका गर्दुल्ल्याला महिला प्रवाशानं चांगलाच हिसका दाखवलाय. चढलेल्या गर्दुल्याने महिलेवर हल्ला केला. त्यावेळी महिलेने प्रतिकार केला. सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी ही घटना घडली. लेडीज डब्यात का चढला असा जाब विचारल्याने महिलेला त्याने मारहाण केली. त्यानंतर सर्व महिलांनी मिळून त्या तरुणाला पकडलं.

पाहा व्हिडिओ :

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.