पठाणकोट हल्ला : मुंबईतील विमानतळावर सुरक्षा व्यवस्था वाढवली

पठाणकोट हल्ला आयएसआयने घडविल्याने मुंबईतील विमानतळावर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

Updated: Jan 2, 2016, 02:27 PM IST
पठाणकोट हल्ला : मुंबईतील विमानतळावर सुरक्षा व्यवस्था वाढवली title=

मुंबई : पठाणकोट हल्ला आयएसआयने घडविल्याने मुंबईतील विमानतळावर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

अतिरेक्यांनी आतापर्यंत मुंबईला नेहमीच टार्गेट केले आहे. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी मुंबईत सुरक्षा वाढणविण्यात आली आहे.  दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी केलाय. आणखी दोन दहशतवादी असल्याची शक्यता असल्यानं लष्करानं आपली शोध मोहिम सुरु ठेवली आहे. दरम्यान, पहाटे तीनच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला. हे दहशतवादी लष्कराच्या वेशात आल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यानंतर पंजाबसह दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय.

पंजाब, जम्मू-काश्मीरमध्ये हल्ले करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे पुढे आलेय. डिसेंबर २०१५मध्ये आयएसआयची बैठक झाली होती. आयएसआयनं अतिरेकी संघटनांना हाताशी धरुन हा हल्ला घडवलाय. आयएसआयनं जैश-अ-महमद, हिज्बुल अतिरेक्यांना पैसे दिल्याचे पुढे आलेय.