मुंबई : पासपोर्ट बनविणं किंवा रिन्यू करणं म्हणजे डोक्याला ताप... असाच तुमचाही आत्तापर्यंतचा अनुभव असेल. पण, आता या व्यवस्थेत सुधार करण्यात येतोय.
परदेश मंत्रालयाच्या चीफ पासपोर्ट अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशानुसार, आता पासपोर्ट नुतनीकरणासाठी तुम्हाला तुमचा फारसा वेळ खर्च करण्याची गरज उरणार नाही. कारण, पासपोर्ट नुतनीकरणासाठी पोलीस व्हेरिफिकेशनची प्रक्रिया आता संपुष्टात येणार आहे.
या नव्या प्रक्रियेचा ट्रायल सर्वात प्रथम मुंबईत होणार आहे. इथं पोलीस कमिशनर राकेश मारिया आणि रिजनल पासपोर्ट ऑफिसर टी डी शर्मा मिळून या योजनेची अंमलबजावणी करण्याचा काम सुरु करतील. या योजनेनुसार, अल्पवयीन मुलं, सरकारी अधिकारी किंवा वयस्कर व्यक्ती पोलीस व्हेरिफिकेशनशिवाय पासपोर्ट बनवू शकतील.
व्हेरिफिकेशनसाठी उशीर झाला असं सांगत पोसपोर्ट मिळण्यास विलंब झाल्याचं खापर बऱ्याचदा पोलीस विभागावर फोडलं जातं. यासाठी आता एक विस्तृत योजनाही बनवण्यात येतेय. त्यामुळे पोलीस व्हेरिफिकेशनची प्रक्रिया केवळ सात दिवसांत पूर्ण होऊ शकेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.