मुंबई : फ्रान्समध्ये पॅरिस शहरावर मोठा दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईतील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. ठिकठिकाणी चेकींग सुरु करण्यात आली आहे.
फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये एकाच वेळी जवळपास सात ते आठ ठिकाणी दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला. यात १५८ लोकांचे बळी गेलेत. तर २०० पेक्षा जास्त नागरिक जायबंदी झाले आहेत. मुंबईला नेहमीच अतिरेक्यांचा धोका असतो. यापार्श्वभूमीवर येथील सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
फ्रान्सने सीरियामध्ये हस्तक्षेप केल्यामुळे पॅरीसमध्ये हल्ला केल्याचा दावा दहशतवाद्यांनी केला आहे. दरम्यान, सर्वच्या सर्व म्हणजेच ८ दहशतवादी ठार करण्यास फ्रान्स पोलिसांना यश आहे. जगभरातून तीव्र निषेध करण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.