गूगलचे बालदिनाचे डूडल

आज संपूर्ण देशात बालदिन साजरा करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर दरवर्षी २० नोव्हेंबरला बालदिन तथा चिल्ड्रन्स डे साजरा केला जातो. मात्र, देशात जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती निमित्ताने बालदिन साजरा करण्यात येतो. आज नेहरु यांची १२६ जयंती आहे. दरम्यान, गूगलने बालदिनी डूडलद्वारे Google मुख्यपृष्ठावर बालदिन साजरा केलाय.

Updated: Nov 14, 2015, 11:35 AM IST
गूगलचे बालदिनाचे डूडल title=

मुंबई : आज संपूर्ण देशात बालदिन साजरा करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर दरवर्षी २० नोव्हेंबरला बालदिन तथा चिल्ड्रन्स डे साजरा केला जातो. मात्र, देशात जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती निमित्ताने बालदिन साजरा करण्यात येतो. आज नेहरु यांची १२६ जयंती आहे. दरम्यान, गूगलने बालदिनी डूडलद्वारे Google मुख्यपृष्ठावर बालदिन साजरा केलाय.

पहिला बालदिन 
पहिला बालदिन ऑक्टोबर १९५३ मध्ये जगभर साजरा करण्यात आला. १९५४ मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेने ठरवल्यानुसार २० नोव्हेंबर हा जागतिक बालदिन मानला जातो. 

१९५९ सालापूर्वीपर्यंत बालदिन ऑक्टोबर महिन्यात असायचा. १९५४ मध्ये, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेने ठरवल्यानुसार, पहिल्यांदाच बालदिन साजरा झाला. लहान मुलामुलींमध्ये सांप्रदायिक आदान-प्रदान व विविध संप्रदाय वा धर्मांबाबतचे सामंजस्य वाढावे. तसेच बालदिन साजरा करण्यामुळे जगभरातल्या मुलामुलींचे आयुष्य अधिक चांगले बनवण्याची संकल्पना रुजावी असाही हेतू यामागे आहे. 

चाचा नेहरूंची आठवण
भारतात मात्र माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिवशी म्हणजे १४ नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जातो. चाचा नेहरूंना लहान मुले खूप आवडत असत. 

मुलामुलींना सुरक्षित आणि प्रेमाच्या वातावरणात वाढवले गेले पाहिजे, या हेतून हा दिवस साजरा केला जातो. बालकांविषयी पंडित नेहरूंना वाटणार्‍या प्रेमाची आठवण म्हणून १४ नोव्हेंबर हा त्यांचा वाढदिवस आपल्या देशात बालदिनाच्या रूपाने साजरा केला जातो.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.