गृहराज्य मंत्र्यांच्या पीए मिलिंद कदमला लाच घेतांना रंगेहाथ पकडलं

मंत्रालयातील विधी व न्याय विभागाचे सहाय्यक आणि गृहराज्य मंत्री रणजीत पाटील यांचे पीए मिलिंद कदम यांना लाच घेतल्या प्रकरणी मुंबई लाचलुचपत विभागानं रंगेहाथ पकडलंय. 

Updated: Apr 2, 2015, 11:17 AM IST
गृहराज्य मंत्र्यांच्या पीए मिलिंद कदमला लाच घेतांना रंगेहाथ पकडलं title=

मुंबई: मंत्रालयातील विधी व न्याय विभागाचे सहाय्यक आणि गृहराज्य मंत्री रणजीत पाटील यांचे पीए मिलिंद कदम यांना लाच घेतल्या प्रकरणी मुंबई लाचलुचपत विभागानं रंगेहाथ पकडलंय. 

या प्रकरणातील तक्रारदार हे पेशानं वकील असून, "नोटरी पब्लिक"साठी जानेवारी २०१५मध्ये निवड त्यांची निवड झाली होती. या प्रक्रियेस अंतिम मान्यता देण्यासाठी मंत्रालयातील विधी व न्याय विभागाचा सहाय्यक मिलिंद कदम यांनी पाच लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडी अंती साडे तीन लाख रुपये लाचेची रक्कम मिलिंद कदम यांनी ठेवली आणि याची माहिती लाचलुचपत विभागाला दिली आणि त्यानुसार लाचलूचपत विभागानं छत्रपती शिवाजी स्थानका बाहेरील जीपीओ समोर सापळा रचला होता. 

दरम्यान, लाचखोर मिलिंद कदमला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार रंगेहाथ पकडलं गेल्याचं कळतंय. थेट मुख्यमंत्र्यांनीच पकडून दिल्यानं मंत्रालयात खळबळ उडाली आहे.

विधी व न्याय विभागाचे अवर सचिव कदम यांच्याकडे मुख्यमंत्र्यांना संबंधित विभागाचे ब्रिफिंग देण्याची जबाबदारी होती. त्यामुळं त्यांचं मुख्यमंत्री कार्यालयात येणं जाणं होतं. आर्वी (जि. वर्धा) येथील एका वकिलाची नोटरी म्हणून नियुक्ती अंतिम करण्यात आल्याची माहिती
कदम याला मिळाली होती. त्यानं त्या वकिलाशी वारंवार संपर्क साधला आणि तुम्हाला नोटरी म्हणून नियुक्त मिळवून देतो, असं सांगितलं. त्या वकिलांना मुंबईत बुधवारी बोलावून घेतलं.

दरम्यान, मुख्यमंत्र्याशी परिचय असलेल्या या वकिलानं कदमबाबत मुख्यमंत्र्याकडे तक्रार केली. त्यावर मुख्यमंत्र्यानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यास सांगितलं आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्याशी चर्चा केली. वकिलाचे कदमशी दुपारी बोलणं झालं आणि सायंकाळी रक्कम देण्याचं ठरलं. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं त्याला रंगेहाथ पकडलं.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.