इतर बँकेच्या एटीएममधून पैसे काढतांना लक्षात ठेवा

इतर बँकेत एटीएम वापरतांना जरा आता विचार करावा लागणार आहे, कारण तुम्ही तीनपेक्षा जास्त वेळेस इतर बँकेच्या एटीएममधून व्यवहार केल्यास, तुम्हाला त्यासाठी चार्जेस लागणार आहेत, मुंबईत ही मर्यादा तीनच ठेवण्यात आली आहे.

Updated: Oct 26, 2014, 01:31 PM IST
इतर बँकेच्या एटीएममधून पैसे काढतांना लक्षात ठेवा title=

मुंबई : इतर बँकेत एटीएम वापरतांना जरा आता विचार करावा लागणार आहे, कारण तुम्ही तीनपेक्षा जास्त वेळेस इतर बँकेच्या एटीएममधून व्यवहार केल्यास, तुम्हाला त्यासाठी चार्जेस लागणार आहेत, मुंबईत ही मर्यादा तीनच ठेवण्यात आली आहे.

फक्त पहिले तीन व्यवहार मोफत
 १ नोव्हेंबरपासून पहिले तीन व्यवहार मोफत असतील. त्यानंतर तुम्हाला प्रत्येक व्यवहारासाठी पैसे मोजावे लागतील. काही बँकांनी आजच एसएमएस पाठवून आपल्या ग्राहकांना हा इशारा दिला आहे.

तुमच्या बँकेशिवाय इतर बॅकांच्या एटीएममध्ये जाऊन पैसे काढायचे तर पाच व्यवहार मोफत होते, पण काही बँकांनी त्यावर निर्बंध आणले आहेत. 

सारस्वत बँकेच्या नव्या नियमानुसार मुंबईसह दिल्ली, चेन्नई, बंगळूरू, कोलकाता आणि हैदराबाद या देशातील महानगरांमध्ये इतर बँकांच्या एटीएमवर पहिले तीन व्यवहार मोफत असतील. शिवाय महानगरव्यतिरिक्त शहरांमध्ये ही मर्यादा पाच व्यवहार अशी करण्यात आली आहे. 

 ही आकडेवारी मासिक व्यवहारांची आहे. रिझर्व्ह बँकेने ऑगस्ट २०१४ मध्येच हे एटीएम व्यवहारावर निर्बंध आणणारे परिपत्रक जारी केले होते. त्यानुसार १ नोव्हेंबरपासून याची अंमलबजावणी होणार आहे. 

सारस्वतसह इतर बँकांनीही आजपासून ग्राहकांना एसएमएस पाठवण्यास सुरुवात केली आहे. ‘व्यवहार’ म्हणजे फक्त पैसे काढणेच नव्हे! पहिले तीन व्यवहार मोफत असा आदेश असला तरी ‘व्यवहार’ म्हणजे फक्त पैसे काढणेच नव्हे.

एटीएममध्ये जाऊन तुम्ही मिनी स्टेटमेंट वा बॅलन्स इन्क्वायरी केलीत तरी तो ‘व्यवहार’च समजला जाईल. त्यामुळे यानंतर एटीएममध्ये जाल तर मनात व्यवहारांचे गणित मांडूनच जा. नाही तर प्रती व्यवहार २० रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा भुर्दंड सोसण्यास तयार रहा.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.