सरकार आरक्षणविरोधी म्हणून मोर्चे काढणार-प्रकाश आंबेडकर

भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपण आरक्षणासाठी मोर्चे काढणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच आताचं राज्य सरकार आरक्षण विरोधी असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 2, 2016, 06:30 PM IST
सरकार आरक्षणविरोधी म्हणून मोर्चे काढणार-प्रकाश आंबेडकर title=

मुंबई : भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपण आरक्षणासाठी मोर्चे काढणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच आताचं राज्य सरकार आरक्षण विरोधी असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. 

कुणाला आरक्षण देण्याच विरोध नाही, पण मी आरक्षणाच्या बाजूने असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

सोमवारपासून नागपुरात सुरू होणाऱ्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर १५ डिसेंबरला हा मोर्चा नेण्यात येणार आहे.