मुंबईत पाईपलाईन फुटली, ९ जण बुडाले

मुंबईतल्या गोवंडीत महापालिकेची २४ इंचाची पाईपलाईन फुटली. फुटलेल्या पाईपलाईनमधील पाणी परिसरातल्य़ा संजीवनी हौसिंग सोसायटीच्या तळमजल्यात घुसल्यानं ९ जण बुडाले. त्यातल्या ८जणांना वाचवण्यात यश आलयं. तर एकाचा मृत्यू झालाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 8, 2013, 03:37 PM IST

www.24taas.com,मुंबई
मुंबईतल्या गोवंडीत महापालिकेची २४ इंचाची पाईपलाईन फुटली. फुटलेल्या पाईपलाईनमधील पाणी परिसरातल्य़ा संजीवनी हौसिंग सोसायटीच्या तळमजल्यात घुसल्यानं ९ जण बुडाले. त्यातल्या ८जणांना वाचवण्यात यश आलयं. तर एकाचा मृत्यू झालाय.
पाण्य़ात अडकलेल्या नागरिकांची अग्निशमन दलाच्य़ा जवानांनी सुटका केली. मात्र साठ वर्षाच्या देवीसिंह हजारे यांचा पाण्यामुळं घाबरुन मृत्यू झाला. दरम्यान पाणीगळती रोखण्यात आलीय़े.

महाराष्ट्रात एकीकडे पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना मुंबईत पाण्याची नासाडी होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. गोवंडी भागात सोमवारी देवनार- गोवंडीला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन गोवंडी भागातल्या संजीवनी सोसायटीजवळ पहाटे पाचच्या सुमारास फुटली. काही भागात पाण्याची गळतीही सुरू आहे. त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.