मुंबई: बारामुला दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय सैनिकाविरोधात बेताल वक्तव्य करून देशाच्या टीकेचे लक्ष्य झालेले अभिनेता ओम पुरी आता एका पाकिस्तानी चॅनलवर असे काही बोलले की त्यामुळे शिवसेनेचा राग त्यांना झेलावा लागण्याची शक्यता आहे.
काल रात्री ओमपुरी एका पाकिस्तानी चॅनलशी बोलताना त्यांनी पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यासंदर्भात पाठिंबा दिला आहे.. काही दिवसांपूर्वी गुलाम अलीच्या कार्यक्रमासंदर्भात मुंबईतसह भारतात मोठा वाद निर्माण झाला होता. पण शिवसेनेच्या धमकीला सरकारने घाबरले नाही पाहिजे. शिवसेनेला घाबरण्याचे काही काम नाही. त्यांनी आंदोलन केले तर त्यांना करू द्यायचे. त्यांच्याकडे नाही RDX आहे नाही तर AK47, ते काय करणार आपलं....
चॅनलच्या महिला अँकरने विचारले की, सध्याच्या परिस्थिती पाक कलाकारांना त्या ठिकाणी राहिले पाहिजे का त्यावर ओमपुरी म्हणाले की मुंबई पोलिसांनी स्पष्ट सांगितले की ज्यांच्याकडे व्हिसा आणि पेपर्स आहेत. त्यांना घाबरण्याचे काम नाही त्यांना संपूर्ण सुरक्षा दिली जाईल. मी खात्रीने सांगतो की त्यांच्यावर हल्ले होणार नाही.
पुरी म्हणाले, की इस्लामला संपूर्ण जगात बदनाम करण्याचे का केले जात आहे. पाकिस्तानातील कमीत-कमी ७० टक्के नातेवाईक भारतात राहतात, त्यामुळे त्यांना एकमेकांना भेटू दिले पाहिजे. मी सहा वेळा पाकिस्तानात गेलो आहे. मला खूप बरं वाटतं. मी सर्व स्तरातील लोकांना भेटलो आहे. मला प्रेम आणि प्रेमच मिळालं आहे.