शिवसेना विरोधात बसल्यानंतर नजर राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे

आम्ही विरोधात बसणार असल्याचं भाजपने स्पष्ट केल्यानंतर, आता सर्वांची नजर पुन्हा राष्ट्रवादीकडे लागली आहे. राष्ट्रवादीने आतापर्यंत पाठिंब्याबाबत काहीही स्पष्टीकरण दिलं नसलं, तरी स्थिर सरकारसाठी सरकारला बाहेरून पाठिंबा देणार असल्याचं सुरूवातीपासून म्हटलं आहे.

Updated: Nov 12, 2014, 09:20 AM IST
शिवसेना विरोधात बसल्यानंतर नजर राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे title=

मुंबई : आम्ही विरोधात बसणार असल्याचं भाजपने स्पष्ट केल्यानंतर, आता सर्वांची नजर पुन्हा राष्ट्रवादीकडे लागली आहे. राष्ट्रवादीने आतापर्यंत पाठिंब्याबाबत काहीही स्पष्टीकरण दिलं नसलं, तरी स्थिर सरकारसाठी सरकारला बाहेरून पाठिंबा देणार असल्याचं सुरूवातीपासून म्हटलं आहे.

नको त्या मुद्यावर हा पाठिंबा नसेल, असंही यापूर्वी राष्ट्रवादीने म्हटलं आहे. राष्ट्रवादी आता देवेंद्र फडणवीस सरकारला विश्वासदर्शक ठरावासाठी मतदान करणार का?, की राष्ट्रवादीचे आमदार गैरहजर असतील याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

देवेंद्र फडणवीस सरकारला बहुमतासाठी १४५ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे, राष्ट्रवादी गैरहजर राहिल्यास हा आकडा आणखी कमी होऊन देवेंद्र सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सोपे जाणार आहे. राष्ट्रवादी गैरहजर राहिल्यास हा बहुमताचा आकडा कमी होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.