भुजबळ नंतर आता तटकरे - अजित पवार याचा नंबर...???

भुजबळ यांच्याविरोधात धडाक्यात सुरु झालेल्या कारवाईनंतर सिंचनबाबत कधी कारवाई होणार याची चर्चा सुरू झाली आहे.

Updated: Jun 18, 2015, 06:37 PM IST
भुजबळ नंतर आता तटकरे - अजित पवार याचा नंबर...??? title=

मुंबई : भुजबळ यांच्याविरोधात धडाक्यात सुरु झालेल्या कारवाईनंतर सिंचनबाबत कधी कारवाई होणार याची चर्चा सुरू झाली आहे.

तेव्हा याबाबत लवकरच कारवाई सुरु होणार असल्याचे संकेत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिलेत. भुजबळांवर कुठल्याही आकसाने कारवाई केली नाही.

भुजबळांवरच का सिंचनाबाबत का नाही तेव्हा सिंचन घोटाळ्याबाबतही नियमाने कारवाई केली जाईल असे महाजन यांनी स्पष्ट केलंय. सिंचन घोटाळ्याबाबत उच्च न्यायालयाने चौकशीला परवानगी दिली आहे. 

ती लवकरच पूर्ण होणार आहे. आणि चौकशीअंती जो निष्कर्ष निघेल त्यानुसार उच्च न्यायलयाच्या निर्देशानुसार कारवाई होईल असं गिरीश महाजन यांनी सांगितलंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.