कोकण म्हाडातील विजेत्यांसाठी सूचना

कोकण म्हाडात घर लागलेल्या विजेत्यांनी आपलं नवं घर पाहण्यासाठी गर्दी केली आहे, मात्र अनेक ठिकाणी घरांची काम अजून सुरू असल्याने, नमुना फ्लॅट पाहण्यासाठी एक वेळ ठरवण्यात आली आहे, यावेळेत तुम्ही घर पाहायला गेले तर तुम्हाला घऱ पाहायला मिळणार आहे. 

Updated: Mar 1, 2016, 09:31 PM IST
कोकण म्हाडातील विजेत्यांसाठी सूचना title=

मुंबई : कोकण म्हाडात घर लागलेल्या विजेत्यांनी आपलं नवं घर पाहण्यासाठी गर्दी केली आहे, मात्र अनेक ठिकाणी घरांची काम अजून सुरू असल्याने, नमुना फ्लॅट पाहण्यासाठी एक वेळ ठरवण्यात आली आहे, यावेळेत तुम्ही घर पाहायला गेले तर तुम्हाला घऱ पाहायला मिळणार आहे. 

नाहीतर तुमची निराशा होऊ शकते. इतर वेळेस कामं सुरू असल्याने कोणताही अपघात अथवा अभ्यागतांची गैरसोय होऊ नये, याची काळजी म्हाडाने घेतली आहे. 

नमुना फ्लॅट पाहण्याचा वार रविवार ठेवण्यात आला आहे, तसेच सकाळी १० ते दुपारी २ या वेळेतच तुम्हाला नमुना फ्लॅट पाहता येणार आहे. ऐन वेळेस लांब जाऊन आपली फिजिती नको, म्हणून ही वेळ पाळणे आवश्यक आहे, प्रत्यक्षात म्हाडाने अशी कोणतीही सूचना दिलेली नाही.