अकबरुद्दीन ओवैसींच्या जाहीर सभेला परवानगी नाही

एआयएम नेते, आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांच्या  सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे. मुंबईतील शनिवारी होणार्‍या जाहीर सभेला पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे. 

Updated: Feb 7, 2015, 06:09 PM IST
अकबरुद्दीन ओवैसींच्या जाहीर सभेला परवानगी नाही title=

मुंबई : एआयएम नेते, आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांच्या  सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे. मुंबईतील शनिवारी होणार्‍या जाहीर सभेला पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे. 
भायखळा विधानसभा मतदारसंघातून एमआयएमचे आमदार अॅड. वारिस पठाण हे  निवडून आले आहेत. यासाठी मतदारांचे आभार मानण्यासाठी पक्षातर्फे नागपाडा जंक्शन येथे ओवैसी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
 
या प्रकऱणी पोलिसांवर आरोप होत आहेत, कारण, परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त एस. जयकुमार यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, ओवैसी यांना जाहीर सभेस परवानगी नाकारण्यात आली आहे. तरी बंदिस्त सभागृहात सभा घेण्यास मनाई करण्यात आलेली नाही. यावर राजकीय दबावामुळे पोलीस जाहीर सभेस परवानगी नाकारत आहेत, असा आरोप आमदार अॅड. वारिस पठाण यांनी केला आहे.

पोलिसांच्या नकारघंटेनंतर सभेच्या निश्‍चित ठिकाणाबाबत निर्णय घेण्यात आला नव्हता. दरम्यान, सभेपूर्वी ओवैसी हे पठाण यांच्या क्लेअर रोड येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करणार आहेत.

पठाण म्हणाले, राज्यात एमआयएमचा प्रभाव वाढत असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी एमआयएमची धास्ती घेतली आहे. त्याचाच परिणाम म्हणजे पोलिसांवर सर्वच राजकीय पक्ष दबाव टाकत आहेत. कारण विधानसभा निवडणुकीपूर्वी नागपाडा येथील याच ठिकाणी ओवैसी यांची सभा झाली होती. त्याला पोलिसांनी परवानगी दिली होती. मात्र काही महिन्यांत असे काय घडले की ज्याने पोलीस परवानगी नाकारत आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.