मुंबई : कुठल्याही परिस्थितीत गणपती किंवा इतर उत्सव मंडळांना फुटपाथवर मंडप उभारण्यास परवानगी देऊ नये असं स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहे.
याशिवाय उत्सव काळात ध्वनिप्रदूषण विरोधी कायदा आणि नियम याचं कठोर पालन होईल याची खात्री प्रशासनानं करावी असंही न्यायालयानं म्हटलंय.
ध्वनिप्रदूषण विरोधी कायद्याचं उल्लंघन हे नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन आहे. त्याबद्दल फौजदारी कारवाई करण्याचे नागरिकांना अधिकार आहेत असंही न्यायालयानं दिलेल्या निकालात म्हटलंय.
ध्वनिप्रदूषणासंदर्भातल्या अनेक याचिकांवर एकत्रित निकाल देण्याचं काम गेल्या काही दिवसांपासून सुरु होतं. ते मंगळवारी पूर्ण झालयं.. त्यात न्यायालयानं हे कठोर पालनाचे निर्देश दिलेत. नियमांचं उल्लंघन ज्या ठिकाणी होतंय त्या ठिकाणच्या अधिका-यांवरही कारवाई कारवाई करा असंही न्यायालयाने सुनावलेय.