गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना बंदी

गणेशोत्सवात अवजड वाहनं, तसंच ट्रेलर, वाळू, रेती ट्रकची वाहतूक मुंबई-गोवा महामार्गावर बंद करण्यात आली आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ही माहिती दिली आहे.

Updated: Aug 23, 2016, 02:07 PM IST
गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना बंदी title=

मुंबई : गणेशोत्सवात अवजड वाहनं, तसंच ट्रेलर, वाळू, रेती ट्रकची वाहतूक मुंबई-गोवा महामार्गावर बंद करण्यात आली आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ही माहिती दिली आहे.

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरुन गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणा-या प्रवाशांची संख्या मोठी असते. त्यांचा प्रवास सोयीचा होण्याच्या दृष्टीने या महामार्गावरची अवजड वाहतूक, १ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर दरम्यान बंद राहणार आहे. मात्र दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, लिक्वीड मेडिकल ऑक्सीजन आणि भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणा-या वाहनांना यातून वगळण्यात आलं आहे.